Product Summery
Author: Viswanathan Anand
paperback
₹ 259
₹ 299
ही विशीची जीवनकथा आहे तेजस्वी कल्पना वेगवान चाली अढळ चिकाटी भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि पाच वेळा विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकणारे विश्वनाथन आनंद यांनी आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेने आणि निर्भय खेळाने जगाला थक्क केलंय. चेन्नईमध्ये लहानपणी बुद्धिबळातील बालप्रतिभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशीला, अतिशय वेगाने चाल खेळत असल्यामुळे 'लाइटनिंग किड' म्हणून एक नवीन ओळख मिळाली. तिथपासून ते जगातील सर्वात कठीण प्रतिस्पध्र्थ्यांना सामोरं जात जागतिक दिग्गज बनण्यापर्यंतचा, विशीचा प्रवास थरारक वळणांनी, कुशल डावपेचांनी आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यांनी भरलेला आहे.
हे पुस्तक आनंद यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय क्षणांमध्ये डोकावतं. तसेच त्यांचा विजय, पराभव, पुनरागमन आणि अद्वितीय चाली यांचा वेध घेतं. बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घरासाठी एक अशा ६४ छोट्या पण अर्थपूर्ण धड्यांमुळे हे पुस्तक अधिक खास बनतं. दबावाच्या प्रसंगी शांत कसं राहायचं, पराभवानंतर पुन्हा उभं कसं राहायचं किंवा काही चालीच्या पुढील परिस्थितींचा विचार कसा करायचा, हे शिकवणारं हे एका खऱ्या विजेत्याचं कथन आहे. मोठा विचार करण्यासाठी, नम्र राहण्यासाठी आणि तुमचा सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी ही एक प्रेरणादायी मार्गदर्शिका आहे. Read less