Author: Brian Tracy

फोकल पॉईंट (Focal Point Marathi)

  • Pages : 208
  • Category : Self Help
  • ISBN : 9789385223174
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223174
  • Edition : 2
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 1.5 cm
  • Translator : Vidya Ambike

Product Summery

वेळ, पैसा, उत्पादकता, कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी

paperback

₹ 275 ₹ 275


Qty:

Tab Article

वेळ, पैसा, उत्पादकता आणि कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून काही मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. व्यक्तिगत व्यवस्थापनाच्या जगभरातील सर्वोत्तम कल्पना आणि योजनांचे एकत्रीकरण त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे. व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात असामान्य कामगिरी बजावलेल्या स्त्री-पुरुषांच्या सवयी या पुस्तकातून समजतात. कोणतेही काम करताना यश मिळवायचे असेल तर आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायला हवा, उत्पादकता दुपटीने वाढवायला हवे, असे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. व्यवसाय आणि करिअर, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन, आर्थिक स्वातंत्र्य या महत्वाच्या विषयांवरही ते बोलतात. आरोग्य, आत्मशांती या मुद्यांकडेही लक्ष वेधतात.

व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाच्या अतिअपेक्षांच्या ओझ्याखाली तणावपूर्ण जीवन जगणार्‍या आपल्या सर्वांसाठी हे पुस्तक तणावमुक्त करणारे आणि दिलासा देणारे आहे. टाईम. कॉम ब्रिलीयंट! लगेचच हे पुस्तक वाचा. यात तुमचं उत्पन्न आणि वेळ कसा दुप्पट करायचा हे तुम्हाला समजेल. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे अशी मी शिफारस करतो. रॉबर्ट अ‍ॅलन (नथींग डाऊन, क्रिएटिंग वेल्थ आणि मल्टीपल स्ट्रीम्स ऑफ इनकमचे लेखक) खरं यश कसं मिळवायचं याचा अर्कच ब्रायन टे्रसींनी या पुस्तकात दिला आहे. डेनीस वेटली (सेवन सॅक्रेड ट्रूथचे लेखक) वैयक्तिक परिणामकता कशी विकसित करायची आणि ती सर्वोच्च पातळीला कशी न्यायची हे ब्रायन ट्रेसी चांगलेच जाणतात. त्यांच्याइतका या क्षेत्रातील जाणकार माणूस मी पाहिलेला नाही. त्यांच्या ज्ञानाचं सार त्यांनी या पुस्तकात अचूकपणे उतरवलं आहे. हे पुस्तक वाचलंच पाहिजे, अशी मी शिफारस करेन. जॅक कॅनफिल्ड (द पॉवर ऑफ फोकस आणि द चिकन सूप फॉर सोल या मालिकेचे सहलेखक) ब्रायन ट्रेसी हे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास या विषयावरील जगातील एक प्रभावी वक्ते आणि सल्लागार आहेत. टाईम पॉवर, व्हिक्टरी, टर्बो स्ट्रॅटेजी आणि द 100 अ‍ॅब्सोल्यूट अनब्रेकेबल लॉज ऑफ बिझनेस सक्सेस या बेस्ट सेलिंग पुस्तकांचे ते लेखक आहेत.

0 REVIEW FOR फोकल पॉईंट (Focal Point Marathi)

ADD A REVIEW

Your Rating