Product Summery
Author: Kasia Wezowski & Patryk Wezowski
paperback
₹ 247
₹ 275
माणसाच्या मनात काय चाललंय हे त्याची देहबोली सांगत असते आपली देहबोली, हालचाली आणि हावभाव काहीही न बोलता खूप काही सांगतात. या हालचाली आणि हावभावांतून बरीच माहिती मिळते, पण ती नेहमी आपल्याला वाटते तशीच असेल असं नाही. उदाहरणार्थ, स्मितहास्य बहुतेक वेळा आनंद किंवा प्रसन्नता दर्शवतं असं मानलं जातं, पण जर त्या स्मितहास्यामध्ये ओठांचा एक कोपरा थोडा वर गेलेला असेल, तर ते स्मित अहंकार दर्शवतं आणि नकळत त्या व्यक्तीपासून लोक दूर जाऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आणि तंत्रं या पुस्तकात समजावून सांगितली आहेत.
विदाऊट सेईंग अ वर्ड (भाषा देहबोलीची) हे पुस्तक सांगतंः बॉडीलँग्वेज इंटेलिजन्सचे पाच मूलभूत नियम समोरच्याची देहबोली ओळखून आपल्या देहबोलीत कसे बदल करावेत सकारात्मक आणि नकारात्मक देहबोली भावना देहबोलीतून कशा प्रकट होतात निर्णय घेताना देहबोली कशी बदलते शरीराच्या अगदी छोट्या हालचालींचा सखोल अर्थ समोरच्याला प्रश्न न विचारताही देहबोलीवरून उत्तर मिळवता येते