Product Summery
Author: Don Miguel Ruiz & Janet Mills
paperback
₹ 225
₹ 250
मास्टरी ऑफ लव या पुस्तकात डॉन मिग्युअल रुईज सांगतात की, आपल्यामध्ये अशा काही धारणा/समजुती असतात, ज्या प्रेमाला कमकुवत करतात. या धारणा भीतीवर आधारित असतात. या धारणांमुळेच आपल्या नात्यांमध्ये दुःख, भांडणं आणि ताण निर्माण होतो. त्यातून तयार होणाऱ्या भावनिक जखमा कशा भरून काढायच्या हे लेखक सोप्या आणि अर्थपूर्ण कथांमधून सांगतात. त्याचबरोबर, खरा आनंद आणि स्वातंत्र्य कसं परत मिळवायचं, आणि प्रेमासाठी आवश्यक असलेली खेळकर वृत्ती कशी पुन्हा जिवंत करायची हेही सांगतात.
या पुस्तकात आपलं झालेलं पालनपोषण आणि परिपूर्णतेचा अट्टाहास, या गोष्टी स्वतःला नाकारायला कशा प्रकारे भाग पाडतात ? एकमेकांवर नियंत्रण मिळवण्याच्या नादात आपली नाती हळूहळू कशी तुटत जातात ? आपण प्रेम इतरांमध्ये का शोधतो, आणि आपल्यातच ते प्रेम कसं सापडतं ? स्वतःला आणि इतरांना कसं स्वीकारायचं आणि कसं माफ करायचं ? "आनंद बाहेरून मिळत नाही. तो आपल्या आतूनच येतो. आणि तो आपल्या प्रेमाचा परिणाम असतो. जेव्हा आपल्याला कळतं की दुसरं कोणीही आपल्याला आनंदी करू शकत नाही, तेव्हा आपल्याला प्रेमाचं खरं महत्त्व कळतं."- डॉन मिग्युअल रुईज