सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत. त्यांनी केलेल्या पाच फूट रुंद आणि पाच फूट लांब तसेच 45 किलो वजनाच्या पराठ्याची लिम्का रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनेक फेस्टिव्हलचे आयोजन करून ते खवय्यांना सातत्याने नवनवीन रेसिपीज् देतात आणि त्यांना मोहित करतात.
गेल्या 11 वर्षांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’च्या 3000 कार्यक्रमांद्वारे ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचले आहेत. त्यांच्या या कार्याची व अनुभवाची दखल केंद्र शासनानेही घेतली असून त्यांची भारतीय खाद्य निगमच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.