Mirror Publishing

Untitled Document

Madhuras Recipr Veg (मधुराज् रेसिपी)


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223860
Pages : 336
Price :
Product Brief Description

युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज् रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक. हजारोंहून अधिक रेसिपीमधील तुम्ही पसंत केलेल्या आणि खूप सार्‍या नवीन मधुराच्या रेसिपी घरच्या घरी उपलब्ध असणार्‍या साहित्यामध्ये रेसिपी कशी बनवायची याची गुरूकिल्ली अस्सल, पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून भारत आणि अखिल विश्वातील सर्वप्रिय रेसिपींचा खजिना अवघड असो वा सोपी, कुठलीही स्वादिष्ट आणि अचूक करण्यासाठी... सकाळच्या चहा-न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही... दिवाळीच्या फराळापासून चमचमीत पदार्थांपर्यंत सर्व रेसिपी... स्मार्ट व सिक्रेट टीप्स आणि बरेच काही...

Untitled Document
Untitled Document

युट्युबच्या माध्यमातून भारतातीलच नव्हे तर पूर्ण विश्वातील खवय्यांपर्यंत नावीन्यपूर्ण आणि रुचकर अशा रेसिपी घराघरात पोहोचवणार्‍या मधुराचे अल्पवधीतच 10 लाखाहून अधिक सबस्क्राईबर झाले आहेत. छंद आणि आवड म्हणून सुरू केलेल्या पहिल्या युट्युब चॅनलला नुकतीच 9 वर्षे झाली आहेत. आजपर्यंत तिने 1100 हून अधिक रेसिपी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अस्सल पारंपरिक, महाराष्ट्रीयन रेसिपीपासून भारत आणि अखिल विश्वातील सर्वप्रिय रेसिपींचा खजिना ती चाहत्यांसाठी उपलब्ध करून देते. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचे विविध पदार्थ ती सातत्याने देत आहे. मुळची पुण्याची असलेल्या मधुराचे शालेय शिक्षण सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यातील गरवारे कॉलेजमधून अकाऊंटमध्ये पोस्ट गॅ्रज्युएशन केले. टॅक्सेशनमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. एमएनसीज्मध्ये काम करण्याचा अनुभवही तिच्या गाठीशी आहे. मंगेश बाचल यांच्याशी लग्न झाल्यानंतर 2007 मध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये ती वास्तव्य करू लागली. स्वयंपाकातील सुगरणपणा आणि आवड लक्षात घेऊन तेथील मित्र-मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिने रेसिपींवर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आणि नंतर अनेक मराठमोळे पदार्थ युट्युबवर अपलोड करू लागली. अगोदर हे व्हिडिओ इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये होते. रेसिपींना सोशल मीडियातून मिळणार्‍या प्रतिसादातून प्रेरणा घेऊन तिने युट्युबवर मधुराज्र्ेसिपी मराठी चॅनेलची निर्मिती केली आणि आज तिचे लाखो चाहते आहेत. स्वतःच्या सिक्रेट टीप्स अगदी मनमोकळेपणाने ती चाहत्यांना देते, ज्यांचा फायदा गृहिणीला पदार्थ रुचकर करण्यामध्ये होतो.