Mirror Publishing

Untitled Document

Tukda Tukda Jilebi (तुकडा तुकडा जिलेबी)


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223068
Pages : 224
Price :
Product Brief Description

नमस्कार मंडळी मी विष्णू मनोहर..! आपल्यासारख्या खोखंदळ रसिकांच्या उदंड पाठबळावर आणि गुरुजनांसह वडिलधार्‍यांच्या आशीर्वादातून यथाशक्ती मी आपली सर्वांची ‘खाद्यसेवा’ करीत आलो. या खाद्यसेवेच्या प्रवासात अनेक आनंदाचे ‘मैलाचे दगड’ लागले. संकटांचे थोडेफार छोटे-मोठे खडेही पायाला टोचून गेले. मात्र संकट हीच संधी मानल्यामुळे त्या टोचलेल्या खड्यांची चिंता केली नाही. शिवाय सोबतीला तुमच्यासारखे हजारो हितचिंतक पाठीशी अखंडपणे होतेच. त्यामुळे हा प्रवास निसदिन जसा प्रवाही राहिला तसाच तो विविधांगांनी परिपूर्णही झाला. अर्थात म्हणून काही लगेच ‘आत्मचरित्र’ लिहावे इतका काही मी मोठा झालो नाही, किंवा तितका पल्लादेखील गाठला नाही. पण म्हणतात ना, एखादे वाक्य मोठे झाले असेल तर मध्ये योग्य जागी ‘स्वल्पविराम’ घ्यावा, आणि मग पुढे वाक्य सुरू ठेवावे. तसेच काहीसे या पुस्तकाविषयी सांगता येईल. यामध्ये आजवरच्या माझ्या शिदोरीत जमा झालेल्या विविध अनुभवांच्या चवदार आठवणी तुमच्यासाठी सादर करतोय. योग्य तिथे काही ‘रेसिपी’देखील सोबतीला इथे आहेतच. आशा आहे, आपणांस एका वेगळ्या दुनियेत ही ‘जिलेबी’ घेऊन जाईल..... धन्यवाद.....!!

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.