Mirror Publishing

Untitled Document

TED Talks (टेड टॉक्स)


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223594
Pages : 256
Price :
Product Brief Description

कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी शब्दांचा वापर करणार असाल तर हे पुस्तक अवश्य वाचा. - अ‍ॅडम ग्रँट, व्हार्टनमधील प्रोफेसर, गिव्ह अँड टेक अँड ओरिजनल या पुस्तकाचे लेखक. या जगामध्ये क्रिस अँडरसन यांच्यासारखं इतक्या चांगल्या पद्धतीने पब्लिक स्पीकिंगचं पुस्तक कोणीच लिहू शकत नाही. त्यांनी माझ्यासह कित्येक लोकांना वक्तृत्व कला शिकवली आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्वांत जास्त घाबरलेली असते त्या वेळी तिला सर्वोत्तम भाषण देण्यासाठी प्रेरणा देण्याची कला त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक प्रत्येक वक्त्यासाठी एक अमूल्य भेट आहे. - एलिझाबेथ गिल्बर्ट, इट, प्रे, लव्ह आणि द सिग्नेचर ऑफ ऑल थिंग्ज या पुस्तकांच्या लेखिका. टेड टॉकच्या माध्यमातून पब्लिक स्पीकिंगच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या झोप आणणार्‍या निरर्थक भाषणांचा आता कायमचा शेवट होणार आहे. या नव्या पद्धतीने खर्‍या अर्थी कल्पनांचे आदन-प्रदान होऊ शकेल याची मला खात्री आहे. -स्टेव्हन पिंकर, हार्वर्डमधील प्रोफेसर, हाऊ द माइंड वर्क्स आणि द सेन्स ऑफ स्टाईल या पुस्तकांचे लेखक. क्रिस अँडरसन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून फार परिश्रमाने पब्लिक स्पीकिंगची नवी परिभाषा निर्माण केली आहे. भाषणाच्या वेळी काय करायचे आणि काय करायचे नाही याविषयी माहिती सांगणारा हा ग्रंथच त्यांनी तयार केला आहे. भाषणाच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍या प्रत्येकाला गाईड म्हणून हे पुस्तक मोठी क्रांती करेल. - सर केन रॉबिन्सन, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रिएटिव्ह स्कूलचे लेखक.

Untitled Document
Untitled Document

Chris Anderson is the owner of TED, a nonprofit organisation that provides idea-based talks and hosts an annual conference in Vancouver, British Columbia, Canada. Previously he founded Future Publishing.