Mirror Publishing

Untitled Document

Ase Ghadwa Tumche Bhavishya (असे घडवा तुमचे भविष्य)


Edition : 3
Latest Edition : July 16
ISBN No : 9788192702087
Pages : 216
Price :
Product Brief Description

‘‘माझ्या आयुष्यात येणार्‍या इतक्या सार्‍या अडचणींसमोर हार न मानता मी जर इतकं काही करू शकलो तर कोणीही हे करू शकतं, हाच संदेश मी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना देऊ इच्छितो. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन एका जरी युवकाने स्वतःचं स्वप्न साध्य केलं तर माझा लिहिण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन. हे पुस्तक देशभरातील युवकांनी मेल्सद्वारे विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेली उत्तरं ही माझ्या जीवनातील अनुभवातून मी जे काही शिकलो त्याचे सार आहे. ही उत्तरं अशा प्रकारे समोर मांडली आहेत, की जे वाचक अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांनासुद्धा या उत्तरांमध्ये दडलेले संदेश उपयोगी पडतील.’’

Untitled Document
Untitled Document

डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम, भारताचे अकरावे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान विशेषज्ञ, शिक्षक आणि थोर विचारवंत आहेत. संपूर्ण भारतभर प्रवास, दौरे करून जवळजवळ 17 दशलक्ष युवकांशी त्ङ्मांनी संवाद साधला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचा प्रचंड अनुभव आणि सखोल दृष्टिकोन वापरून शासनाच्या विविध घटकांची चर्चा केली आहे. भविष्यातील भारताविषयी असणारा त्यांचा दृष्टिकोन ते स्पष्टपणे मांडतात. तसेच तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काय केले पाहिजे,हेही सांगतात. त्यांच्या मते, प्रामणिकपणा, उच्च नीतिमत्ता आणि कठोर परिश्रम याद्वारेच आपण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतो.